जरी लाख सुंदर सख्यांच्या सपाता
मला भावल्या या परांच्या सपाता
निरागस मुलांच्या मनांना जपाया
किती रंग ल्याल्या फुलांच्या सपाता
निळ्या पाखरांसम उडाया नभी या
अता घालुदे मज पऱ्यांच्या सपाता
मृदुल पाउले ही गुलाबांप्रमाणे
तयां रक्षिती या शरांच्या सपाता
तुझे पाय दोन्ही जणू खांब दगडी
तुला शोभती या खड्यांच्या सपाता
कशाला हव्या तुज सुनेत्रा सपाता
कधी पाहिल्या का खगांच्या सपाता
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा/ल गा गा/ल गा गा/ल गा गा/