भुजंग – BHUJANGA


गझल सळसळूदे भुजंगाप्रमाणे
तिच्या नेत्रज्योती कुरंगाप्रमाणे

गझल मैफिलीला अता रंग चढला
तुझी साथ मजला मृदंगाप्रमाणे

अता दोर आहे धरेच्याच हाती
भरारे गझल ही पतंगाप्रमाणे

मुला-माणसांनी फुला-पाखरांनी
गझल गुणगुणावी अभंगाप्रमाणे

जली राजहंसा तुझा डौल भारी
गझल त्यात माझी तरंगाप्रमाणे

वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा /ल गा गा/ ल गा गा /ल गा गा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.