मनाची चाल मोठी मनाला पंख वाऱ्याचे
किती स्वप्ने तुझी आई तुझे आभाळ ताऱ्यांचे
कुठे असशील आता कोण सांगेल मज गुज-गोष्टी
किती गझला तुझ्यासाठी मला मोल तव चाऱ्याचे
कशाला रे तुला शेती हवी बागायती माझी
हवी तर मग भरावे तूच पैसे शेतसाऱ्याचे
पुरे झाले बहाणे लाडक्या ओलांड सीमेला
नको कौतुक मला सांगू नजरभेटी नजाऱ्यांचे
किती थोतांड माजविता पुराणातिल कहाण्यांचे
बरे आयुष्य होते ते म्हणे सन्मति शिकाऱ्याचे
बरी आहे जिथे आहे नव्हे वेडी सुनेत्रा ही
नको दावूस भय तिजला दऱ्या सुळके कपाऱ्यांचे
वृत्त – वियदगंगा, मात्रा २८
लगावली – ल गा गा गा/ल गा गा गा/ल गा गा गा/ल गा गा गा/