घन तोडे कनक कळ्यांचे हातात सखीच्या सुंदर
जणु कळ्या जुईच्या पिवळ्या गजऱ्यात सखीच्या सुंदर
पाण्यावर शीतल निर्मल दो भावकळ्यांच्या वाती
लखलखत्या दीपक ज्योती नयनात सखीच्या सुंदर
गझलेतुन सळसळणारी श्वासातुन दरवळणारी
प्रीतीची अमृतगाथा हृदयात सखीच्या सुंदर
ती हसते तेव्हा गाली रुततात गुलाबी मोती
कुंडले जपेची डुलती कानात सखीच्या सुंदर
तू सांगशील का आता तव हृदय चोरले कोणी
प्रश्नाला उत्तर सुंदर ओठात सखीच्या सुंदर
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा