मी इळभर लिवले शिवले पर कागुद चिंधी झाला
ती उनाड मैना कावुन शबुदाचा करती काला
त्यो पान खाउनी थुकला मी हुशार हाये म्हणला
मंग मीबी बोल्ले लिवरं त्यो चघळत बसला पाला
म्या कायबाय गिरगटलय त्ये चिडलं तरिबी हासतय
खट दाजी सरकिट येडा पन खासा दिसतुय साला
गझलच्या जिमीनीमंदी मिरचीचा वाफा सजला
ये तोडू लवंगि मिरची त्यो इवाय घालल घाला
औंदाच्या सालीसुद्दा म्यां कोबी फुलवर केला
कट फक्कड मटार भुर्जी खायाला गुर्जी आला
हे इंजन कुक कुक वाजे पाटातुन व्हातय पानी
ढबु शिमला मिरची सुकली तिजलाबी पानी घाला
वावरी राबते कसते बाजारी सौता इकते
घरधनीन गल्ल्यावरती लय भाव तिच्या मालाला
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा