ये भांडू आता थोडे गोडीने साखर वाढे
कंटाळा आला मजला चल पाठ करूया पाढे
घालून घाव चोचीने पिंजरा शृंखला तुटता
फांदीवर पोपट झुलतो खावयास पेरू दाढे
तू घाल जरासे पाणी भांड्याच्या आत तळाला
करपेल विस्तवावरती मम क्षीरच निरसे गाढे
परसातिल बागेमध्ये लावूत औषधी झाडे
काढूया अर्क मुळांचा बनवाया अस्सल काढे
दे काम अता तू त्याला जे जमेल त्याला पुरते
उद्योग न त्याला कुठला तो पडून निरखे आढे
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा