स्वागतास सज्ज मी वीस पंधरा तुझ्या
चांदण्यात नाहण्या कृष्ण अंबरा तुझ्या
नीलवर्ण पाखरे गात गात चालली
चुंबण्यास पापण्या गौर शंकरा तुझ्या
सौरभात दाटली मुग्ध मौन प्रीत तू
जाणते इथून मी शुभ्र अंतरा तुझ्या
पारिजात वेचते सुंदरा झुकून ती
कुंतलात झेलते कैक कंकरा तुझ्या
मेघनेत गच्च सौदामिनी कडाडते
साथ द्यावया नभा सत्य संगरा तुझ्या
साधना करीत मी मुक्त होत राहिले
लागले जहाज हे स्वच्छ बंदरा तुझ्या