चिडावे रडावे परी ना कुढावे
मला जे कळाले तुलाही कळावे
यमाला सुपारी जरी तू दिली रे
तिला चोरुनी मी कुटावे न खावे
तुझी जिंदगानी मला खूप प्यारी
म्हणोनी सख्या तू पडावे लढावे
किती प्रेम माझे अजूनी तुझ्यावर
नयन चुंबण्या तू स्वप्नात यावे
तुझे मौन गाणे जगा ऐकवाया
तुझ्या बासरीचे अधर मीच व्हावे
अक्षरगणवृत्त (मात्रा २०)
लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/