लिहित रहा तू स्वतःस कळण्या हवे स्वतःला काय
दुखविलेस का व्यर्थ स्वतःला कारण शोधुन काढ
संदेहाच्या हिंदोळ्यावर झोके घेत अनेक
विचार घुसळुन सापडेल तुज काव्याची लय छान
भुकेल्यास दे घास स्वतःतिल प्रेम मुक्या जीवास
प्रायश्चित्तासाठी आता कशास व्रत उपवास
भेटीसाठी जो जो आतुर फक्त तयांना गाठ
गाठीभेटी घडण्यासाठी प्रयत्न कर तू खास
गुरू स्वतःचा स्वतःच होउन मित्र-मैत्रिणी जोड
सदा स्वतःला कोसायाची सोडुन दे रे खोड
पळत्यापाठी नको धावणे घे थोडा विश्राम
दमून भागुन बसल्यावरती चेप स्वतःचे पाय
कवि हृदयातिल मूर्त गोजिरी काव्य बाळ गुण खाण
कवित्त्व म्हणजे कवि बाळाचे यत्न बोधिचे जाण
मात्रावृत्त (१६+११=२७ मात्रा)