अनंत रूपे घेउन छळण्या कैक भेटले सोंगाडे
सिद्धपथाला तुक्या लागला जरी कुणी ना वाटाडे
किती भामटे भोंदू साधू भोळे शंकर भासविती
डोईवरच्या जटा वाढवुन घालुन फिरती अंबाडे
आकाशातिल ग्रह ताऱ्यांना कुंडलीत का बसवीती
दिशाभूल करण्या भोळ्यांची लुटण्या त्यांना थापाडे
मृत व्यक्तीचे शरीर जाळुन अथवा मातीत गाडून
नाश पावते तनु अन उरती फक्त सापळे सांगाडे
खरी संस्कृती शुद्ध प्रकृती जतन कराया अन जपण्या
अजूनही तग धरुन ‘सुनेत्रा’ जुने पुराणे हे वाडे
मात्रावृत्त (१६+१४=३० मात्रा)