छत्री घेउन निळी निळी
फिरायचे मी जळी स्थळी
पाऊस धार ये धो धो
तुडुंब भरण्या धरण तळी
कडेकपारी या धुंडू
खळखळणाऱ्या शुभ्र घळी
पानापानांवरी हसे
प्राजक्ताची कळी कळी
श्रावण बरसे रंगसरी
इंद्रधनूला मार हळी
मात्रावृत्त(१४ मात्रा)
छत्री घेउन निळी निळी
फिरायचे मी जळी स्थळी
पाऊस धार ये धो धो
तुडुंब भरण्या धरण तळी
कडेकपारी या धुंडू
खळखळणाऱ्या शुभ्र घळी
पानापानांवरी हसे
प्राजक्ताची कळी कळी
श्रावण बरसे रंगसरी
इंद्रधनूला मार हळी
मात्रावृत्त(१४ मात्रा)