तुझ्याआधी घरी माझ्या पाऊस आला
कुणासाठी घरी माझ्या पाऊस आला
चिंब काया मोहराया रिंगण धराया
चंद्रमौळी घरी माझ्या पाऊस आला
अंतरीचे बोल बोली ऐकून टिपण्या
देत हाळी घरी माझ्या पाऊस आला
झरे ओढे वाहताती संगीत देण्या
भरत पाणी घरी माझ्या पाऊस आला
तावदाने वाजवूनी डोकावत हळू
म्हणत गाणी घरी माझ्या पाऊस आला
सुनेत्राला भेटावया इथे ढगातून
नदीकाठी घरी माझ्या पाऊस आला
मात्रावृत्त (७+७+९=२३ मात्रा)