धान्यधून्य अंगणात पारव्यास घाल
भूक लागलीय त्यास जेवण्यास घाल
कुजट मिट्ट लाकडास ऊन देच आज
लागलीय ओल त्यास वाळण्यास घाल
शेणकूट घे वरून घासलेट ओत
चूल पेटवून त्यात ओंडक्यास घाल
तेल कडक तापवून उडव मोहरीस
फोडणीत स्वच्छ धुवुन माळव्यास घाल
फोड फोड हालवून वाफवून छान
तिखट मीठ वरुन त्यात मुरवण्यास घाल
गझल-अक्षरगण वृत्त,मात्रा २१
लगावली-गालगाल/गालगाल/गालगालगाल/