गर्वाचे घर कर्दमि रुतले
मम प्राणावर तू नभ धरले
अतिव सुखाने हृदय स्पंदले
धुके हळुहळू विरले खिरले
निर्भय निर्भय अभय जाहले
मी प्रेमाने विश्व जिंकले
पूर्ण प्रीतीचे गीत प्रकटले
लेखणीतुनी माझ्या झरले
‘मी’ पण माझे मला भावले
लिहून गझला पुरून उरले
मात्रा १६…