हवे कशाला परक्याचे तुज आसन रे
वाद्य चोरुनी कशास करिशी वादन रे
फुलव अंतरी शुद्ध भाव अन गात रहा
करावयाचे असेल तुज जर गायन रे
परस्त्री संगे भोगाची का तुज इच्छा
या करणीने होइल तुजला शासन रे
सम्यक्त्वाचे बीज रुजाया तव हृदयी
शुद्धात्म्याचे कर तू पूजन अर्चन रे
गुणानुरागी होउन गुण तू घेत रहा
कर दोषांचे नित्य आपुल्या शोधन रे
मात्रावृत्त – २२ मात्रा