ज्याचा गुरू इलाही
त्याला उणे न काही
ज्याचा गुरू इलाही
वैरीच त्यास नाही
ज्याचा गुरू इलाही
त्याच्यात प्रेम राही
ज्याचा गुरू इलाही
त्याच्यात कपट नाही
ज्याचा गुरू इलाही
त्याची मळे न बाही
ज्याचा गुरू इलाही
त्याचीच शुभ्र बाही
ज्याचा गुरू इलाही
ओझे न त्यास काही
ज्याचा गुरू इलाही
त्यासी दुरून पाही
ज्याचा गुरू इलाही
त्याचे सुनेत्र दाही
अक्षर गण वृत्त – मात्रा १२
लगावली- गागालगा/लगागा/