धंदा अथवा असो चाकरी इमान इतबरे तू कर रे
हिशेबास ही चोख असावे तुझे वचन खरे तू कर रे
प्रकृतीस तव मानवणारा धर्म उजळण्या अंतर्यामी
खऱ्या दिगंबर गुरूस वंदन झुकुनी दो करे तू कर रे
नकोस तोडू नाजुक पुष्पे सजविण्यास पुद्गल काया
टपटपलेल्या प्राजक्तांचे गुंफुनी गजरे तू कर रे
व्यवहाराने साध निश्चया नय कसरत ही पेलायास
पिंजऱ्यातली घुसमटणारी विमुक्त पाखरे तू कर रे
सोने चांदी हिरे माणके यांच्याहुनही विशुद्ध अश्या
दागिन्यांनी रत्नत्रयरुपी नटूनी नखरे तू कर रे
गझल मात्रावृत्त- ३१ मात्रा