पुन्हा बहरले कळ्याफुलांनी झाड सुबक ठेंगणे
पुन्हा सजविले रहाट लावुन आड सुबक ठेंगणे
उंच पोफळी नारळ बागा साद मला घालिती
माझ्याशी बोलाया झाले माड सुबक ठेंगणे
बांध बासनी ग्रंथ पुराणे अन पुस्तक रंगीत
वाचायाला पाठवून दे बाड सुबक ठेंगणे
तपवायाला दुग्ध चुलीवर मंदाग्नी असूदे
ठोक्याचे घे पात्र स्टीलचे जाड सुबक ठेंगणे
विरजवुनी कोमट क्षीराला ठेव झाकुनी सखी
पूर्ण भरोनी माठ दह्याचे धाड सुबक ठेंगणे
गझल मात्रावृत्त – मात्रा २७(१६+११)