माझे मन माझे तन
जपे आठवांचे क्षण
वारियाने हलतात
जणू दाटलेले घन
जसे फांदीवर पुष्प
तसे मुक्त माझे मन
शीळ घालतोय वात
शहारते सारे बन
सुगंधीत रान मस्त
मातीचाया कणकण
नाकी नऊ आणेन
सोड तुझा मूढे…पण
आत्मरुप संपदेचे
सुनेत्रात सारे धन
गझल मात्रावृत्त – १२ मात्रा