चेहरा हरवला आहे कुणाचा त्यातला जो आहे खरा
चेहरा घडवला आहे कुणाचा त्यातला तो आहे खरा
भाबडा रचयिता होता जरी रे गुंतला का गोष्टीमधे
चेहरा भिजविला आहे कुणाचा त्यातला हो आहे खरा
गाजरे पिकविली जी तू गुलाबी गोडशी त्या रानामधे
चेहरा लपविला आहे कुणाचा त्यातला भो आहे खरा
बावरी प्रियतमा गोरी कुणाला घाबरे ही सांगा बरे
चेहरा सजवला आहे कुणाचा त्यातला घो आहे खरा
लाखदा सुकवुनी कर्मांस साऱ्या जाळुनी ते गेले कुठे
चेहरा डकवला आहे कुणाचा त्यातला शो आहे खरा
गझल अक्षरगण वृत्त, मात्रा ३३
लगावली – गालगा/लललगा/गागा/लगागा/गालगा/गा/गागा/लगा/