कोळी – KOLEE


काल पेटली दारी होळी
आज मस्त पुरणाची पोळी

दो प्रहरी तू येच पावसा
पाडाया गारांची टोळी

धारांसंगे करूत गप्पा
भर-भरण्या गारांनी झोळी

येता वादळ अपुल्यामध्ये
त्यांस पकडण्या येइल कोळी

सहाण घेऊ चंदन उगळू
गुळात घोळुन बनवू गोळी

येता कपटी भेटायाला
मिळून चौघे बांधू मोळी

गझल – मात्रावृत्त, मात्रा १६(८+८)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.