सावलीची कैक बाळे
बाळ छाया स्वैर बाळे
तू जरासे ऊन पांघर
रापण्याला ऐक बाळे
शीक सत्याचीच भाषा
मिथ्य आहे गैर बाळे
कष्ट झाले फार आता
कर जरा तू ऐश बाळे
फिर सुनेत्रा छप्परातुन
दाव त्यांना ऐट बाळे
गझल – अक्षरगणवृत्त (मात्रा १४)
लगावली – गालगागा/गालगागा/