मी निळे प्राशुनी निळी बावरी बनले
मी हिरवे प्राशुन सृजनामध्ये रमले
मी कुंकुम प्राशुन लुटुन निसर्गा आले
मी गडद रक्तिमा गाली फासुन खुलले
मी हळद प्राशुनी गोरीमोरी झाले
मी जर्द केवड्यासम रानी घमघमले
मी जांभुळ प्राशुन दिव्य औषधी झाले
मी मूक पारव्या जीवन पुन्हा दिधले
मी धवल प्राशुनी धवल कशी ना झाले
मी इंद्रधनूच्या रंगात सात सजले
गझल मात्रावृत्त (मात्रा २२)