गाठ – GAATH


दशधर्माचे दे रे पाठ
चुकांवरी तू मारुन काट

वर्षे काही थोडी छाट
निवृत्तीचे वय ना साठ

कधी न दुखते माझी पाठ
मी तर असते सदैव ताठ

प्रेमाचा मी चढले घाट
साय सुखावर आली दाट

कुणी न अडवी माझी वाट
स्वागतास दो आले काठ

माझ्या पायी झुकते लाट
अंतरात ना माझ्या गाठ

पक्वान्नाने भरले ताट
शुद्ध जलाने भरला माठ

गझल मात्रावृत्त (मात्रा १६)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.