कुमारिकांच्या हृदयामध्ये वसले गणेशरूप
मोदक हाती घेउन बसले हसले गणेशरूप
तीर्थंकर वाणी खिरताना विशद कराया तिला
ऋद्धी सिद्धीसंगे गणधर बसले गणेशरूप
सम्यग्दर्शन चारित्र्याने ज्ञान झळकता खरे
धर्मामधल्या मिथ्यात्त्वाला डसले गणेशरूप
अर्ध्या अधुऱ्या मिटुन पापण्या अंतर्यामी बघे
बुद्धीची देवता बनूनी ठसले गणेशरूप
शिकवुन संयम मनुष्यप्राण्या केले त्याने मूक
मज आकळले मला भावले असले गणेशरूप
गझल मात्रावृत्त (मात्रा २७)