घरात बसुनी ना काजळली आतम समई
जीवासाठी मम मिणमिणली आतम समई
क्षीण जाहली…. लहरीने वाऱ्याच्या अवखळ
क्षणभर विझली पुन्हा उजळली आतम समई
भूकंपाने घर कोसळता पुरात बुडता
देवघरातिल तमात टिकली आतम समई
सम्यक्त्त्वी ज्ञानाने घडली थरथरली पण
मिथ्यात्त्वाने कधी न दिपली आतम समई
वादळवारे सुनामीसही पुरून उरली
चक्राला भेदून तेवली आतम समई
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)