गोम्मट व्हिल्यावर घन झुकला
पाण्याने भरल्यावर झुकला
रंग पारवा निळसर ज्याचा
असा जिना वळणावर झुकला
वेल कळ्यांनी लदबदली अन
शुभ्र फुलांचा मांडव झुकला
भित्तीचित्रे कलापूर्ण ही
पहा त्यातला मानव झुकला
जलाशयावर बरसायाला
रंग भरूनी श्रावण झुकला
गोम्मट हाऊस मधुन कटता
व्यंतर कपटी ! नागर झुकला
गोम्मट हाऊस मधले प्रेम
पाहुन ओला मोसम झुकला
जेते इथले आत्मधर्ममय
आत्म्यांवर तो चेतन झुकला
नवरंगी गुणधर्मी मंदिर
कळस त्यावरी पिंपळ झुकला
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)