अता खरे तू बोलावे
पूर्ण पुरे तू बोलावे
खोटे नाते नको जपू
जसे झरे तू बोलावे
फसवी आशा पुरी नसे
जरा बरे तू बोलावे
पाऊस येण्यासाठी ग
हरित धरे तू बोलावे
कशास चर्चा जगण्याच्या
कोण मरे तू बोलावे
सर्वांमध्ये ढोंग दिसे
मीच उरे तू बोलावे
कोठडीतुनी सुटावया
खरेखुरे तू बोलावे
नको लावु तू ओकाया
पचे जिरे ते बोलावे
रंगहीन जल रंगाया
प्रेमभरे तू बोलावे
गझल मात्रावृत्त (मात्रा १४)