शुद्ध आत्मा दक्ष “मी” मन न्हात येते
जे हवेसे वाटते ते गात येते
“आत्महित आधी करावे ” सांगुनीया
मोरपीशी लेखणी हातात येते
भय अता कुठलेच नाही देत ग्वाही
काव्य सुंदर रंगुनी प्रेमात येते
चांदणे कैवल्यरूपी बरसताना
भावनांनी चिंबलेली रात्र येते
वाचलेले दर्शनाने जाणलेले
ज्ञान सम्यक चाखण्या पानात येते
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१)
लगावली – गागालगा/ ३ वेळा