कवितेची बनवाया छत्री आली सारी पोरे
कवितेची फिरवाया छत्री आली सारी पोरे
कल्पनेतली पद्ममोहिनी विद्येला भिजवाया
कवितेची उडवाया छत्री आली सारी पोरे
आषाढातिल मेघगर्जना ऐकुन उडता इरले
कवितेची फुलवाया छत्री आली सारी पोरे
रंगबिरंगी कळ्या जोडुनी मजबुत दांड्यावरती
कवितेची सजवाया छत्री आली सारी पोरे
मस्त रोहिणी निळ्या अंबरी इंद्रधनुष्यी बसता
कवितेची झुलवाया छत्री आली सारी पोरे
गझल मात्रावृत्त (मात्रा २८)