हृदयात माझ्या हसे अतिशय अतिशय
चिखलात रुते खोटा अभिनय अतिशय
उघड तूच सांग अता फसलाय खेळ
इतुके ग नाही बरे जनभय अतिशय
आत्मबळ वाढवेल वेड दिवाने
येते काय प्रिय तुला मम सय अतिशय
नाचतेय मूळ खोड फुलासंगती
अल्लड हे अजूनही तव वय अतिशय
जमणार गझल पल्लेदार लिहाया
सूर ताल जाण पकड अन लय अतिशय
गझल मात्रावृत्त (मात्रा २०)