सुदृढ सुंदर शुद्ध निरामय जीवन सळसळणारे अमुचे
अंतरातल्या मधुर क्षणांचे गायन सळसळणारे अमुचे
सत्य अहिंसा प्रेम धबाबत हृदयामधुनी उसळत आहे
तन मन वचनामधून मंजुळ वादन सळसळणारे अमुचे
अभय जाहलो अभय कराया जीव भद्र मोक्षाचे मार्गी
हरेक माध्यम काबुत ठेवे शासन सळसळणारे अमुचे
बदल घडावा बदल टिकावा स्वधर्म सत्याचा टिकण्याला
गुणानुरागी वारे वाहे पावन सळसळणारे अमुचे
तलवारी तोंडाचे पट्टे चालविणारे दूर चालले
लढण्यासाठी शस्त्र लेखणी साधन सळसळणारे अमुचे
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)