निशिगंधाच्या हारामध्ये लाल गुलाबांचा वावर ग
शुभ्र लिलीची दले मलमली त्यात सुगंधाचा दरवळ ग
कण्हेर कोरांटीचे कुंपण साद घालिते का चाफ्यास
ते न शोधिते त्यातिल अत्तर जाग ऐकुनी ती सळसळ ग
अरिष्टनेमीचे शोधाया कूळ गाडले जे मातीत
मत्त गाढवे म्हणती दाबुन उमद्या घोड्या त्या खेचर ग
मानस्तंभ तो ऐसा शोभे कषाय विरहित होऊनिया
जिनमूर्तीचे घे दर्शन अन तुझा पसारा तू आवर ग
कृष्ण दुपट्टा गळ्याभोवती लपेटून घे जैसा नाग
आवळेल तो ऐसा तुजला कळण्या त्यागाचे कारण ग
कैसा सांगा तुम्हा दाखवू छान देखणा चेहरा मी
अधीर आहे म्याच ‘सुनेत्रा’ मैत्री त्यास्तव तारण ग
गझल मात्रावृत्त (मात्रा ३१)
स्वरकाफिया गझल