देहा अवघ्या तपवित आहे ग्रीष्माची काहिली
पावसातही जाळे दाहे ग्रीष्माची काहिली
हळूहळू उतरेल तप्तता भिजवुन गात्रे पुरी
शीतल करण्या वारा वाहे ग्रीष्माची काहिली
दवाच दे मज पथ्य नको पण म्हणते म्लान परी
पुसते कारण स्वतःच काहे ग्रीष्माची काहिली
शुद्ध निरामय आरोग्याची मिळे संपदा फुलां
मारुन जंतू सत्यच पाहे ग्रीष्माची काहिली
आजारीपण पळवुन लावुन नाचनाचुनी पुन्हा
धारांमध्ये भिजवित नाहे ग्रीष्माची काहिली
गझल मात्रावृत्त, मात्रा २७ (८/८/११/)