क्षमाच केली मी मजलाही
मार्दवात मम् भिजे इलाही
घाट चढाया मोक्ष-मुक्तिचा
आर्जव माझे झाले राही
निर्मल आत्मा दवात न्हाता
शौच अंतरी दिशात दाही
भादव्यातले ऊन तप्त हे
कैसे माझे तन मन साही
बोल बोल प्रिय माझ्यासंगे
प्रिय वचने तू सुंदर काही
सरस्वती शारदा सुंदरी
अक्षरपुष्पे तुजला वाही
दर्पणात अन नयन जळी तव
जिनबिंबा मी सदैव पाही
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)