मी तर सुंदर सुडौल मोहक तरुण मनाची बाई आहे आई आहे
पूर्ण नार मी विजेप्रमाणे कडाडणारी घाई आहे आई आहे
सुजला सुफला मम् गझलेच्या जमिनीमध्ये अक्षरबीजे पेरायाला
लेखणीतुनी टपटपणारी मी झरणारी शाई आहे आई आहे
शुभ्र सरोवर राजहंस अन लहरींवरती टपोर कमळे अशी मनोरम
गर्द गारवा पांघरलेली मी आंब्याची राई आहे आई आहे
मस्त काफ़िये रदीफ लोभस सारवानही जयात आहे ऐसी रमणी
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मी तर ठाई ठाई आहे आई आहे
अनेक भाषी सात्त्विक राजस तामस वृत्ती धबाबणारी अगणित वृत्ते
सामावुन घेणारी अनवट खोल गूढ मी खाई आहे आई आहे
गझल मात्रावृत्त (मात्रा ४०)