दुर्लक्षित ना ना व्यापारी, घाणेरी निवडुंग रुई
खुलते झुलते घरात दारी काटेरी निवडुंग रुई
जिथे बालके रोगी दुबळी रोजच मरती तिथे तिथे
लसी टोचण्या करिती वारी बाणेरी निवडुंग रुई
तल्लख करुनी घ्राणेंद्रियांस घाणेरीच्या फुलांसवे
झुरळे माश्या मच्छर मारी सोनेरी निवडुंग रुई
झेंडू शेवंतीच्या संगे वाड्यामधुनी सासरच्या
येतीजाती फुलबाजारी माहेरी निवडुंग रुई
दीपोत्सव भूवरती येता दिवे लावण्या वनी फुले
दागदागिने लेउन भारी पानेरी निवडुंग रुई
गझल मात्रावृत्त (१६/१४) ३० मात्रा
द्विकाफिया(जुल्काफिया ) गझल