पूर्ण चंद्र रात शीत गात गात चालली
नाव वल्हवीत गीत गात गात चालली
चंचला हवा परी झुळूक मुग्ध लाजरी
अंतरी भरून प्रीत गात गात चालली
संगमी मुळामुठेत नाचण्यास नर्तिका
वीज आग पाखडीत गात गात चालली
डोंगरी धबाबत्या जलात मस्त दामिनी
कातळा करून चीत गात गात चालली
चांदणे दुधासमान सांडता धरेवरी
ओंजळी निशा भरीत गात गात चालली
गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २३)
लगावली – गालगाल/ गालगाल/ गालगाल/ गालगा/