धडधडते काळीज थांबता तुझ्यासवे मी घेतो श्वास
तव देहाचा झालो परिमल अता राहिलो ना मी भास
टकटक होता द्वारावरती मीच उघडले हसून दार
म्हणालीस तू सत्वर या या आत पातले अतिथी खास
पाणिदार मोत्यांचे आसन अतिथी वदता आम्हा हवे
अंगठीतले मौक्तिक पाणी सांडुन भूवर झाली रास
दिव्यध्वनी तीर्थंकर वाणी सर्वांगातुन खिरता गान
गणधर आत्मा झुकून बोले मी सत्याची धरतो कास
लेक आईची नि दादांची छान सुनेत्रा माझे नाव
मुक्तछंद मी खळाळणारा कशास मोजू घटिका तास
गझल- मात्रावृत्त (मात्रा ३१)