विमान हे खरेच दिव्य तू बसून त्यात ये
ललाल लाल लाल लाल लाल लाल गात ये
तुझाच देश धर्म वाट पाहतो तुझी इथे
निवांत छान मास मार्गशीर्ष कार्तिकात ये
तुझ्यावरी रचावयास प्रेमगीत ते उभे
लपेट शाल दोरवा पहाट गारव्यात ये
स्वरात सात चांदण्यात रंगवून सत्य तू
मजेत वाजवीत शीळ कौतुकात न्हात ये
उनाड ऊन कोवळे दवात चिंब चिंबता
तुझ्या खुल्या घरातल्या गुलाब ताटव्यात ये
शिकावयास आजही नवे जुने मिळे तुला
शिकून शिकविण्यास ते पुनश्च भारतात ये
जशी हवा तसा सुगंध रंग ढंग उधळुनी
परीसमान उडत उडत द्यावयास हात ये
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २४)