रदीफ काफियासवे गझल मस्त शोभते
तंग जरी काफिया ग वसन चुस्त शोभते
सारवान आज नको तूच उंट हाक रे
पुनवेची चांदरात ग्रहण गस्त शोभते
भेटण्या मला बरी पुलावरील झोपडी
महागड्या घराहुनी स्वच्छ स्वस्त शोभते
गण मात्रा लगावली तराजूत तोलण्या
लष्करची तुला गडे शान शिस्त शोभते
हत्तीवर पागोळ्या बसुन बरस बरसती
भरला घट उखळ मुसळधार हस्त शोभते