स्वप्न गुलाबी अथवा काळे
अनवट झाले त्याचे जाळे
नको करू जाळ्याचा गुंता
खेळुदेत कोळ्यांची बाळे
पोखरती घर मुळे जयांची
खणून काढू त्यांची पाळे
राव रंक हा भेद जिथे रे
त्या गुत्त्याला लावू टाळे
विसरायाला स्मृती कालच्या
करू नको तू भलते चाळे
मम गझलांना जपण्यासाठी
नित्य कागदांना मी जाळे
सुगंध शिंपायास सुनेत्रा
केसांमध्ये जुईस माळे