ग़ज़लेवरती गझल लिहाया गझल पुन्हा झाले
गझलेला मम दाद द्यावया तरल पुन्हा झाले
विडंबनाची व्याख्या शोधुन विडंबने लिहिली
विडंबनासम वक्र होउनी सरल पुन्हा झाले
परिमल खोडुन परिमळ लिहिले मागे मी गेले
काफियास टाळाया सवती कमल पुन्हा झाले
कवितांच्या मी गझला केल्या गझलांच्या कविता
काव्य त्यातले जपण्यासाठी सजल पुन्हा झाले
स्वतःस वाटुन मी पाट्यावर चूर्ण मऊ झाले
वस्त्रगाळ चूर्णाला करुनी विमल पुन्हा झाले