टिपत राहणे काव्य निरंतर
हाच जादुई जंतर मंतर
माझ्यासाठी मम अभिव्यक्ती
हाच जादुई जंतर मंतर
अभ्यंतर काबूत असावे
हाच जादुई जंतर मंतर
अंतर अपुले सतत चाळणे
हाच जादुई जंतर मंतर
अंतर पाहुन वेग ठरविणे
हाच जादुई जंतर मंतर
स्त्री पुरुष दो माणूस जाती
हाच जादुई जंतर मंतर
देव नारकी गती जाणणे
हाच जादुई जंतर मंतर
जपत अलामत निवड काफिया
हाच जादुई जंतर मंतर
तिर्यंचाहुन वर वर जाणे
हाच जादुई जंतर मंतर
प्रत्यंतर शब्दातील टिंब
हाच जादुई जंतर मंतर
व्यंतर बिंतर विसरुन जाणे
हाच जादुई जंतर मंतर
नंतर नंतर नंतर बोलू
हाच जादुई जंतर मंतर
लिही सुनेत्रा बोल सुनेत्रा
हाच जादुई जंतर मंतर
मात्रावृत्त (१६ मात्रा)