मोक्षपथावर कधी न अडले घोडे माझे
मम चरणांची वाट पाहती जोडे माझे
खूप ऐकले उपदेशाचे डोस जनांचे
ऐकत असते मीही आता थोडे माझे
घात टाळण्या घाटामधल्या वळणावरती
मोहक वळणे घेता अक्षर मोडे माझे
मीच घातले होते मजला जे अनवट ते
लयीत लोभस सहज उलगडे कोडे माझे
गंडेदोरे का नडतील ग मला सुनेत्रा
करी झळकता कनक कळयांचे तोडे माझे