शौच म्हणा वा शुचिता मजला स्वच्छ राहूदे फक्त मला
वक्रपणा जर ना सोडे मी शिक्षा व्हावी सक्त मला
भरून प्याले ओतुन प्याले करण्यासाठी रिक्त मला
अता व्हायचे भूमीसाठी कोसळणारा हस्त मला
जरी भावते थट्टा तुजला धर्म शोध तू त्यात खरा
मृदुता माझी माझ्यासंगे लागायाला शिस्त मला
क्षमा माझिया लेखणीतली अविरत झरझर प्रेम झरे
भिववित नाही कपोलकल्पित ब्रह्मांडाचा अस्त मला
मन तन वचने यात सरलता आर्जव याचे नाव बरे
हाच दागिना जवळी माझ्या नकोस समजू स्वस्त मला
या रचनेतिल अलामतीतिल दोष ओळखुन सांग सखी
नसेल जर का दोष कोणता कशास करशी फस्त मला