अधिक अधिक – ADHIK ADHIK


जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….
गात्रांतुन कडकडती वीज खेळवाया
सैराटी वाऱ्यातुन धूळ येय गाया ….

जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….
मातीने माखुनिया देहगंध जाया
अंगांगी जलदांतिल धार नाचवाया…

जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया …
कुष्णधवल मेघांची ऐसपैस छाया
तप्त लिप्त भूमीवर पांघरून घ्याया…

जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….
आकाशी पोकळीत गगन भरुन न्हाया
अधिक अधिक मीपण मम खिरुन खिरुन काया….

जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….
भिजव सई चिंब चिंब अत्तरात फाया
कोजागर पुनवेला चांदणे झराया………

जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….
जन्म हवा पुन्हा पुन्हा इहलोकी याया ….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.