वेळ – VEL


ही न वेळ असे खरी
वाट पाहण्याची….
हीच वेळ असे खरी
भेटाया जाण्याची…
गप्पांच्या मैफलीत
रंग नवे भरण्याला …
हृदय उघड उघड मना
काव्य नित्य झरण्याला ….
बोल फक्त बोल गात
गुणगुणता काही…
अंतरंग सांगतेय
गुज मला बाई….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.