अप्रतिम अष्टाक्षरी ..
आहे जातिवंत खरी …
जात पात पाहतो जो …
त्यास धुण्या बाई बरी
अप्रतिम अष्टाक्षरी …
आहे जातिवंत खरी..
अप्रतिम शब्द धारा …
णमोकार मंत्रातली..
जात पाते लखलख ..
परजते क्षत्राणी मी
अप्रतिम दृष्टी आत्म्या
तुला पाहण्यास येते…
धुते कषाय मनीचे..
तुझ्या चरणी झुकते…
अप्रतिम कळा सोसे…
नार तुझ्या जन्मासाठी…
होते नरवीर नारी..
पुरुषार्थ करणारी…
अप्रतिम आत्मपणा…
सत्य अहिंसा हा धर्म..
गुणस्थान मोज तूच…
ओळ माझी प्रेमदायी…
अप्रतिम भाव माझा
चैतन्याची ज्ञानधारा…
कोण फिके नको चर्चा
दिगंबर देव खरा…