अंताक्षरी स्वराक्षरे ..ओव्या अभंगांची खाण..
गात गुणगुणते मी .. भागते मी बोजडास …
कधी गझल लिहावी लगावलीला टाळून …
कधी सहज लीलया ..धावणारी मात्रेतच ..
बेसुमार वा सुमार .. तणांसवे वाढे ऊस..
कसे खुरपावे तण,, धो धो कोसळे पाऊस
माझी चपला नाचरी वीज ढगातून नाचे ..
अंगणात खळ्यांमध्ये स्वच्छ किती नीर साचे…
सोन्यासम रान पान लखलख कंच पाती…
सांजवात लावते ग चांदण्यात चतुर्दशी